दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००
Left Logo
झोपुप्रा योजना
Online RTS सेवा
Right Logo

प्राधिकरणाची माहिती

पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आणि पिंपरी-चिंचवड हे शहर उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरामध्ये उद्योग, व्यवसाय, शिक्षण तसेच रोजगार यासाठी देशाच्या अन्य भागातून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होतात. स्थलांतरित होणाऱ्या लोकांना किफायतशीर दरातील निवाऱ्याची सोय उपलब्ध होत नसल्याने, झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणे भाग पडते. सद्यस्थितीत पुणे शहरामध्ये ४८६ झोपडपट्ट्यामध्ये साधारण १,६५,००० एवढ्या कुटुंबाचे वास्तव्य असून शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे २८%लोक झोपडपट्टीत राहत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ७१ झोपडपट्ट्या असून त्यामध्ये सुमारे ३५,२६१ कुटुंबाचे वास्तव्य आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १४.७८ टक्के लोक झोपडपट्टीत राहत आहेत. झोपडपट्टीतील अस्वच्छ व अनारोग्य असलेल्या परिस्थितीत तेथील लोक खडतर अवस्थेत जीवन कंठीत असतात. सर्वसामान्य जनतेप्रमाणे झोपडीधारकाचे स्वत:च्या घराचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार, झोपडपट्टीधारकांना आवश्यक त्या सोयी सुविधायुक्त मोफत घर/सदनिका उपलब्ध करून देऊन त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे यासाठीचे एक प्रभावी अभियान म्हणजे महाराष्ट्र शासनाची झोपडपट्टी पुनर्वसन योजना होय. या योजनेमध्ये शासनाने झोपडपट्टीने व्यापलेल्या जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून सुयोग्य वापर करून प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाते. त्यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

शासनाने प्राधिकरणाच्या माध्यमातून पात्र झोपडीधारकांना त्यांच्या स्वप्नातील मालकी हक्काचे घर विनामूल्य देवू केले आहे. तसेच दि. १६ मे, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, असंरक्षित झोपडीधारकांसाठी सशुल्क योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांच्या स्वप्नाला बळकटी प्राप्त होत आहे. झोपडपट्टी मुक्त शहर करणे हा प्राधिकरणाचा ध्यास आहे. “अल्पायुषी प्राधिकरण आणि पुनर्विकास चिरंतर” झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे ध्येय आहे.

स्थापना

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड या प्राधिकरणाची स्थापना महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभागाकडील दिनांक ३० जून २००५ रोजीच्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे.

संबधित वैधानिक तरतुदी

१. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३(अ) नुसार स्थापना.
२. कार्यक्षेत्रा करीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना, अधिनियम १९६६ चे कलम २(१९)(ब) अन्वये नियोजन प्राधिकरण.

उद्देश

१. झोपडीधारकांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.
२. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टी मुक्त शहर करणे.
३. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गंत पात्र झोपडीधारकांना स्वत:च्या मालकीचे सर्व सुविधायुक्त 300 चौ.फूट चटई क्षेत्राची सदनिका विनामूल्य उपलब्ध करून देणे.
४. दि. १६ मे, २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, असंरक्षित झोपडीधारकांसाठी सशुल्क योजना (रु.२.५० लक्ष किंमतीत) ची प्रभावी अंमलबजावणी करणे.

कार्यक्षेत्र

१. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी क्षेत्र तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये नव्याने समावेश झालेली गावामधील झोपडपट्टी क्षेत्र.
२. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्र

प्राधिकरण्याच्या कामकाजासंदर्भातील अधिनियम, नियम व नियमावली

अ.क्र. अधिनियम, नियम व नियमावली वर्ष
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र ( सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास ) अधिनियम, १९७१. ११/०८/१९७१
पुणे मनपाच्या विकास नियंत्रण नियमावलीतील Appendix T प्रमाणे सुरु. १९९४
झोपुप्रा विकास नियंत्रण नियमावली, २००८. ११/१२/२००८
झोपुप्रा विकास नियंत्रण नियमावली, २०१४. ११/०९/२०१४
राष्ट्रीय इमारत संहिता - २०१६. २०१६
झोपुप्रा विकास नियंत्रण नियमावली, २०१४ मधील प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांकामध्ये सुधारणा. १७/१२/२०१८
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र ( सुधारणा, निर्मुलन आणि पुनर्विकास ) (सुधारणा) अधिनियम, २०१७. २६/१२/२०१८
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१. २६/०१/१९६२
एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR). ०३/१२/२०२०
१० झोपुप्रा विकास नियंत्रण नियमावली, २०२२ साठी राज्य शासनाची मंजूरी. ०५/१२/२०२३
११ झो.पु. अधिनियम,1971 च्या कलम ३ब (४) अंतर्गत प्रसिध्द झालेली योजना म्हणजेच MRTP, १९६६ च्या प्रकरण III नुसार लागू असलेली विकास नियंत्रण नियमावली.
झो.पू.प्रा. पुणेचा एकच ध्यास... अल्पायुषी प्राधिकरण, आणि पुनर्विकास चिरंतर.

नव्याने दाखल होणाऱ्या योजना (76)

LIVE
क्वालिटी डेव्हलपर्स सि.स.नं.2526 ते 2530 2533 2535 2537 2541 ते 2565 बोपोडी 08-05-2026
टी.एस.जी. रिनोव्हेशन एल.एल.पी. सि.स.नं.3467 चव्हाण चाळ कळस 05-05-2026
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.335 सि.स.नं.952 वडार वाडी शिवाजीनगर 28-04-2026
एस.एम. स्पेसेस फा.प्लॉ.नं.327 सि.स.नं.944 वडार वाडी शिवाजीनगर 28-04-2026
यशएंम्पायर डेव्हलपर एल.एल.पी. स.नं.88/8 गुजरात कॉलोनी कोथरुड 22-04-2026
प्रवीण त्र्यंबक भोसले प्रा.लि. सि.स.नं.185 वडगावशेरी 09-04-2026
एंम्पायर कन्स्ट्रक्शन माणिक नाला नानापेठ 30-01-2026
पद्मकमल इस्टेट सि.स.नं.824 825 भवानी मंदीर भवानीपेठ 30-01-2026
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.488 487A 487B साईनाथनगर लक्ष्मीनारायण थियेटर जवळ पर्वती-2 12-11-2025
साई मिरॅकल डेव्हलपर्स पेरूबाग निगडी सेक्टर नं.22 11-11-2025
आकांक्षा कन्स्ट्रक्शन फा.प्लॉ.नं.580 ललितादेवी दत्तवाडी पर्वती 10-11-2025
पुर्णायू एंटरप्रायजेस पाटकर प्लॉट महात्मा गांधीनगर 31-10-2025
ग्रेस डेव्हलपर्स बाल तरुण मंडळ एरंडवणा 02-09-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.385B वडार वाडी शिवाजीनगर 14-08-2025
साई अमृत कन्स्ट्रक्शन एल.एल.पी. फा.प्लॉ.नं.486अ साईनाथनगर लक्ष्मीनारायण थियेटर जवळ पर्वती-1 13-08-2025
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. संजय गांधीनगर पिंपरी 24-07-2025
साई इन्फ्रा सि.स.नं.375 सचपीर वस्ती रास्तापेठ 27-06-2025
स्मार्टिक्स रिहॅब एल.एल.पी राजेवाडी नानापेठ 17-06-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. चैत्रबन वसाहत बिबवेवाडी 19-05-2025
पुर्णायू एंटरप्रायजेस फुले नगर MIDC भोसरी 30-04-2025
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन सि.स.नं.1967 हिराबाई लांडगे कासारवाडी 23-03-2025
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. प्लॉ.नं.56 ते 68 जाधव वस्ती रावेत 20-03-2025
वरद व‍िनायक डेव्हलपर्स दशभुजानगर एरंडवणा 20-03-2025
साई इन्फ्रा राजीव गांधीनगर येरवडा आळंदी रोड 20-03-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. स.नं.23 24 कामना वसाहत कर्वेनगर हिंगणे बु 26-01-2025
चंद्रशेखर रिअल इस्टेट प्रा.लि. स.नं.58 कामना वसाहत कर्वेनगर हिंगणे बु 20-01-2025
तनुजय इन्फ्राकॉन एल.एल.पी. विद्यानगर आकुर्डी 03-01-2025
सुवर्णा गृहम् रुपीनगर निगडी 27-11-2024
पश्चिम बिल्डर्स जाधवनगर येरवडा 12-11-2024
बीम्स हाऊसिंग रियालिटी एल.एल.पी. राजीव गांधीनगर येरवडा 06-11-2024
साई प्रॉपर्टी सोल्यूशन एल.एल.पी. सर्वोदय कॉलोनी मुंढवा 15-10-2024
साई इन्फ्रा अण्णाभाऊ साठे वसाहत पर्वती 14-10-2024
न्यू सहारा कन्स्ट्रक्शन गुरुनानकनगर कासेवाडी भवानी पेठ 09-10-2024
प्रवीण त्र्यंबक भोसले प्रा.लि. विद्यानगर आकुर्डी 04-10-2024
आर. के. डेव्हलपर्स प्लॉ.नं.217 ते 258 जाधव वस्ती रावेत 09-08-2024
मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी प्रा.लि. जहांगीरनगर हडपसर 17-05-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज काळभोरनगर आकुर्डी 09-05-2024
श्री सोनिगरा इंफ्राकॉन इंदिरानगर पिंपरी 26-04-2024
श्री सोनिगरा इंफ्राकॉन कैलासनगर पिंपरी 26-04-2024
सॅसकॉन डेव्हलपर्स आझादनगर निगडी सेक्टर नं.22 22-04-2024
शिवम डेव्हलपर्स प्रा.लि. पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत पौड फाटा 18-04-2024
ओम साई कन्स्ट्रक्शन गांधीनगर प‍िंपरी 15-04-2024
विघ्नहर्ता रियालीटी मोरेवस्ती भिमशक्तीनगर चिखली - 1 05-04-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज एम बी कम्प (विकासनगर) किवळे 12-03-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज मुळानगर जुनी सांगवी 05-03-2024
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन संग्रामनगर निगडी सेक्टर नं.22 07-02-2024
अय्यम डेव्हलपर्स एल.एल.पी. जोशी वस्ती घोरपडेपेठ 05-02-2024
त्रिकाया बिल्डकॉर्प एल.एल.पी. साईनाथनगर थेरगाव 20-09-2023
युनिक सदानंद डेव्हलपर्स इंदिरानगर प्रोजेक्ट इंदिरानगर मंगळवारपेठ 18-09-2023
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. शास्त्रीनगर पिंपरी 12-09-2023
टी.आर.एस. इन्‍फ्रा भावसार कार्यालय घोरपडेपेठ 30-08-2023
श्री सोनिगरा इंफ्राकॉन अण्णाभाऊ साठेनगर निगडी सेक्टर नं.22 14-08-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. म्हस्के वस्ती रावेत 28-07-2023
रेनबो डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर एल.एल.पी. सुभाषनगर पिंपरी 18-07-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. काळभोरनगर आकुर्डी 12-07-2023
आर. के. डेव्हलपर्स रमाबाई निराधारनगर पिंपरी 14-06-2023
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. श्रमिक वस्ती वडार वस्ती कर्वेनगर 14-06-2023
क्रिशाला इलाईट एल.एल.पी. अशोकनगर ताथवडे 22-05-2023
ग्रेस डेव्हलपर्स प्लॉ.नं.210 ते 216 जाधव वस्ती रावेत 19-05-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. प्लॉ.नं.191 ते 209 जाधव वस्ती रावेत 16-05-2023
सुशीलम प्रॉपर्टीज एल.एल.पी. सि.स.नं.276 277अ 278 ते 281अ 281ब बुधवारपेठ 23-12-2022
आर. के. डेव्हलपर्स नागसेननगर चिंचवड 05-12-2022
आर. के. डेव्हलपर्स अजंठानगर पत्रा शेड आकुर्डी 05-12-2022
रेनबो डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर एल.एल.पी. राजनगर ओटा स्कीम निगडी सेक्टर नं.22 06-10-2022
राजवीर असोसिएट्स गुरुदत्तनगर पिंपरी रेल्वे स्टेशन 21-07-2022
राजवीर असोसिएट्स भारतमातानगर पिंपरी रेल्वे स्टेशन 21-07-2022
रेणुका कन्स्ट्रक्शन स.नं.242 आनंदनगर चिंचवड 19-07-2022
राजवीर असोसिएट्स संजय गांधीनगर पिंपरी 10-05-2022
साई इन्फ्रा गजमलवाडी शिवाजीनगर 21-02-2022
स्पायर व्हेंचर्स सि.स.नं.830 भवानी मंदीर भवानीपेठ 24-01-2022
परमार बोरा असोसिएट्स पत्रा चाळ नानापेठ येथील SRD योजना 01-03-2021
कुणाल रियालिटी भोईरनगर चिंचवड 19-08-2020
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन तापकीरनगर रहाटणी 12-06-2020
विनर डेव्हलपर्स भीमनगर कोंढवा खुर्द 20-08-2019
साई इन्फ्रा स.नं.24 बोपोडी 24-12-2018
सुयश व्हेंचर्स स.नं.101/1 ब्लॉक 1ब जनवाडी जनता वसाहत 06-09-2018

झोपुप्रा योजना - डॅशबोर्ड

LIVE
झोपुप्राकडे सादर केलेल्या योजना
योजना संख्या 371
झोपडीधारक संख्या 126345
मंजूर केलेल्या योजना
योजना संख्या 295
झोपडीधारक संख्या 100131
दप्तरी दाखल केलेल्या योजना
योजना संख्या 44
झोपडीधारक संख्या 19804
प्रस्ताव दाखल करणेवर योजना
योजना संख्या 76
झोपडीधारक संख्या 26214
पूर्ण केलेल्या योजना
योजना संख्या 71
झोपडीधारक संख्या 12505
सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना
योजना संख्या 180
झोपडीधारक संख्या 67822

आमची गॅलरी

×
×
Zoomable preview
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority