दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००
Left Logo
झोपुप्रा योजना
Online RTS सेवा
Right Logo

शंका समाधान (FAQ)

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्य क्षेत्रातील म्हणजेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीत वास्तव्य असणा-या पत्र झोपडीधारका कुटुंबास झोपडीच्या/घराच्या ऐवजी मोफत पक्की सदनिका मालकी हक्कने देण्याची ही योजना आहे. सदनिका ३०० चौ.फुट (२७.८८ चौ.मी.) चटई क्षेत्राची असेल व सदनिकेमध्ये एक बहुप्रयोगी खोली(हॉल), स्वयंपाकासाठी जागा व स्वतंत्र संडास व न्हाणीघर देण्यात येते.

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसनासाठी प्रत्यक्षात झोपडीत राहात असणारा झोपडीवासीय पात्र ठरतो एखादी व्यक्ती सदर झोपडीची मालक म्हणून हक्क सांगत असली, परंतु ती प्रत्यक्ष सदर झोपडीत राहत नसेल तर ती पुनर्वसनाचे लाभ घेण्यास पात्र ठरत नाही.

उत्तर – झोपडीची गणना होवून त्याचा फोटोपास असलेली झोपडी (संरक्षित झोपडी) झोपडीमध्ये प्रत्यक्ष राहत असलेल्या झोपडीवासीयाने विकत घेतलेली असेल तर तो झोपडपट्टी पुनर्वसन प्रधीकारणाकडून पुनवर्सनास पात्र ठरतो.

उत्तर – असा मूळमालक पुनर्वसनास पात्र ठरत नाही. तसेच तो शासनाच्या इतर घरांच्या योजनांसाठी अपात्र ठरतो.

उत्तर – मूळमालक पुनर्वसनास पात्र ठरत नाही.

उत्तर – नाही. सदर जागावरील पात्र झोपडीवासीयांचे पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतर योजनेमध्ये येते.

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसन प्रधीकारनाकडून पुनर्वसनास परवानगी दिली जात नाही त्यांना पुनर्वसन क्षेत्रापासून हटविले जाते.

उत्तर – दिनांक 01/01/2000 रोजीच्या मतदार यादीत झोपडीधारकांचे नाव व झोपडीचा स्वतंत्र क्रमांक नमूद केलेला असतो. मतदार यादीच्या संबंधित भागाची संक्षांकित प्रत त्या मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडे मिळू शकते.

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी कुटुंब म्हणजे ज्यांची नावे दि. 01/01/2000 रोजीच्या मतदार यादीत एकाच झोपडीमध्ये राहत असल्याचे दर्शविण्यात आलेली आहेत, अशा त्या झोपडीत राहणाऱ्या व्यक्ती.

उत्तर – नाही, या योजनेत एका झोपडीत राहणाऱ्या सर्व व्यक्तींचे एकच कुटुंब म्हणून गणले जाते आणि त्यांना एकाच सदनिका मिळेल.

उत्तर – नाही एकाच कुटुंबास एकच सदनिका मिळेल.

उत्तर – अशा प्रसंगी पात्रता सिद्ध करण्यासाठी सदर झोपडीधारकाची झोपडी व त्यामधील त्याचे वास्तव्य हे दि01/01/2000 रोजी किंवा त्यापूर्वीपासून असल्याचे शासकीय/ निमशासकीय संस्थांनी दिलेल्या दस्तऐवजाच्या आधारे सिद्ध करणे गरजेचे आहे. उदा. शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना (मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948 अन्वये दिलेला परवाना, खानावळ/उपहार गृह परवाना, औद्योगिक परवाना, गुमास्ता परवाना इत्यादी.) सादर केला पाहिजे. झोपडीधारकाच्या नावाने व झोपडी असलेल्या पत्त्यावर दि 1 जानेवारी 2000 पूर्वीचे वीज बिल, दूरध्वनी देयक किंवा कर, व्यवसाय कर, आयकर इत्यादी करांचा भरणा केल्याचा पुरावा असला पाहिजे. वरीलपैकी कोणताही पुरावा सादर केल्यास झोपडीधारक योजनेत लाभ मिळण्यास पात्र होईल.

उत्तर – केंद्र शासनाच्या मालकीच्या झोपडपट्टीबाधित जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिल्यास त्या जमिनीवर ही योजना राबविता येईल.

उत्तर – एखाद्या ठिकाणच्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांनी एकत्र येऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे नोंदणी केलेल्या व जमीन मालकांकडून जमीन विकसनाचे हक्क संपादित केलेल्या विकसकास किंवा अन्य विकसकास झोपुप्रा. राबविण्याबाबत विहित नमुन्यातील संमतीपत्र / करारपत्र नोटरी समोर निष्पादित करावे. झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांपैकी किमान 70% झोपडीधारकांनी योजना राबविण्यासाठी विकसकास संमती दिल्यास विकासकाने दखल केलेला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रस्ताव मंजुरी साठी विचारात घेता येतो.

उत्तर – झोपडीधारकांचे झोपडीतील वास्तव्य हे दि. 01/01/2000 पूर्वीपासूनचे असल्यास व अशा झोपडीधारकाचे नाव परिशिष्ट-2 मध्ये पात्र म्हणून समाविष्ट असल्यास त्या झोपडीधारकाने योजनेस संमती दिली नसेल तरीही त्यास योजनेमध्ये सदनिका/गळा मिळू शकतो.

उत्तर – असा झोपडीधारक त्याचा पुनर्वसनाचा हक्क गमावू शकतो आणि त्यास योजना क्षेत्रातून निष्कासित करण्यात येते.

उत्तर – नाही, एका झोपडीधारकास एकाच विकसकास संमती देता येते.

उत्तर – परिशिष्ट-2 मध्ये योजना क्षेत्रातील सर्व झोपडीधारकांचे नावे तसेच योजनेचा लाभ मिळण्यास पात्र/अपात्र असलेले झोपडीधारक तसेच संबंधित झोपडीचे मोजमाप व वापराबाबतचा तपशील असतो.

उत्तर – परिशिष्ट-2 मध्ये पात्र म्हणून नाव समाविष्ट असल्याखेरीज झोपडपट्टीधारकास पुनर्वसन योजनेमध्ये मोफत सदनिका/गळा मिळू शकत नाही.

उत्तर – परिशिष्ट-2 साठी आवश्यक कागदपत्रे झोपडीधारकांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे दखल करणे त्यांचे हिताचे आहे. अन्यथा असे झोपडीधारक अपात्र ठरल्याने पुनर्वसानाचा हक्क गमवू शकतात.

उत्तर – सक्षम प्राधिकारी, परिशिष्ट-2 ची प्रत वसाहतीत ठळक ठिकाणी प्रसिद्ध करतात. तसेच ती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यालयात उपलब्ध होऊ शकते.

उत्तर – होय. परिशिष्ट-2 प्रसिद्ध केल्यापासून 30 दिवसांचे आत झोपडीधारक हे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनवर्सन प्रधिकारण यांचेकडे फेट तपासणीसाठी आर्ज करू शकतात.

उत्तर – ज्या व्यक्तीचे नाव संबंधित योजनेच्या परिशिष्ट-2 मध्ये अंतर्भूत आहे अशा पात्र झोपडीधारकाने त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांचेकडे सविस्तर तपशिलासह तक्रार करावी.

उत्तर – सार्वजनिक हिताचे प्रकल्प राबविताना बाधित होणाऱ्या दि 1/1/2000 पूर्वीच्या झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिका/ गळा मिळण्याचा हक्क आहे. तथापि त्यांचे पुनर्वसन त्याचा जागी करणे शक्य नसल्यास त्यांचे पुनर्वसन इतरत्र करण्यात येते. अशा पुनर्वसनासाठी झोपडीधारकांच्या संमतीची आवश्यकता नसते.

उत्तर – कायदे- १) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ २) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नियमावली- १) नगरविकास विभागाने दि. ११/९/२०१४ रोजी मान्य केलेली विशेष नियमावली २) पात्रतेविषयक गृहनिर्माण विभागाने दि. १६/०५/२०१५ रोजीचे परिपत्रक ३) शासनातर्फे वेळोवेळी परिपत्रक देण्यात येणारे निर्देश

उत्तर – झोपुप्राचा प्रस्ताव झोपडीधारकाच्या गृहनिर्माण संस्थेस त्यांच्या सर्वसाधारण सभेची बहुमताने मंजुरी घेवून झोपुपप्राकडे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही विकासकाकडून दाखल करता येईल.

उत्तर – विकासक, पात्र झोपडीधारक तसेच झोपुप्रा प्रतिनिधी यांचे उपस्थितीत सोडत पद्धतीने पात्र झोपडीधारकांच्या सदनिकांचे वाटप निश्चित करणेत येते. यावेळी विधवा तसेच अपंग झोपडीधारकांना पहिले प्राधान्य देण्यात येते.

उत्तर – झोपडीधारकांच्या गृहनिर्माण संस्थेस १२ चौ.मी. कार्पेट क्षेत्राचे सोसायटी ऑफीस तसेच ४ चौ.मी. कार्पेट क्षेत्राचे टॉयलेट देण्यात येते. तसेच योजनेतील पात्र झोपडीधारकांची कारपेट क्षेत्राची बालवाडी तसेच वेल्फेअर सेंटर सोसायटीस देण्यात येते.

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे क्षेत्र ४००० चौ.मी. पेक्षा जास्त असल्यास योजना क्षेत्राच्या ९०% विकसित करून झोपडीधारकांच्या गृहनिर्माण संस्थेस देण्यात येते.

उत्तर – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वसाधारणपणे ४० मी. उंचीपर्यंतच्या इमारती अनुज्ञेय करण्यात येतात.पुनर्वसन घटकाचे काम पूर्ण होणेसाठी यापेक्षा जास्त उंची देखील अनुज्ञेय करणेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा यांना आहेत. या बहुमजली इमारतीसाठी मनपाचे मुख्य अग्निशामक अधिकारी यांचे ना-हरकत पत्रानुसार आवश्यक सुविधा पुरविणेत येतात.

उत्तर – 1) योजनेमध्ये समाविष्ट झाल्याने स्वतःचे वैयक्तिक सर्व सोई-सुविधायुक्त हक्काचं व मोफत घर मिळेल. 2) प्रसन्न व आरोग्यदायी वातावरण मिळेल. 3) सर्व सोयींमुळे राहणीमान उंचावेल तसेच स्वच्छतेमुळे मुलाबाळांच्या आरोग्य चांगले राहील.

उत्तर – 1) झोपडीधारकांना सर्व सोई-सुविधायुक्त हक्काचं व मोफत घर मिळणार नाही 2)अस्वच्छता गलिच्छ वस्तीत राहावे लागेल. 3)मुलाबाळांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक 4)आवश्यक सेवेचा अभाव असल्याने गैरसोय

उत्तर – अपात्र झोपडीधारकाने रक्कम रुपये अडीच लाख SRA कडे भरणा केल्यास त्यांना सदर योजनेमध्ये 300 चौ.फुट सदनिका मिळू शकेल
झो.पू.प्रा. पुणेचा एकच ध्यास... अल्पायुषी प्राधिकरण, आणि पुनर्विकास चिरंतर.

नव्याने दाखल होणाऱ्या योजना (76)

LIVE
क्वालिटी डेव्हलपर्स सि.स.नं.2526 ते 2530 2533 2535 2537 2541 ते 2565 बोपोडी 08-05-2026
टी.एस.जी. रिनोव्हेशन एल.एल.पी. सि.स.नं.3467 चव्हाण चाळ कळस 05-05-2026
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.335 सि.स.नं.952 वडार वाडी शिवाजीनगर 28-04-2026
एस.एम. स्पेसेस फा.प्लॉ.नं.327 सि.स.नं.944 वडार वाडी शिवाजीनगर 28-04-2026
यशएंम्पायर डेव्हलपर एल.एल.पी. स.नं.88/8 गुजरात कॉलोनी कोथरुड 22-04-2026
प्रवीण त्र्यंबक भोसले प्रा.लि. सि.स.नं.185 वडगावशेरी 09-04-2026
एंम्पायर कन्स्ट्रक्शन माणिक नाला नानापेठ 30-01-2026
पद्मकमल इस्टेट सि.स.नं.824 825 भवानी मंदीर भवानीपेठ 30-01-2026
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.488 487A 487B साईनाथनगर लक्ष्मीनारायण थियेटर जवळ पर्वती-2 12-11-2025
साई मिरॅकल डेव्हलपर्स पेरूबाग निगडी सेक्टर नं.22 11-11-2025
आकांक्षा कन्स्ट्रक्शन फा.प्लॉ.नं.580 ललितादेवी दत्तवाडी पर्वती 10-11-2025
पुर्णायू एंटरप्रायजेस पाटकर प्लॉट महात्मा गांधीनगर 31-10-2025
ग्रेस डेव्हलपर्स बाल तरुण मंडळ एरंडवणा 02-09-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. फा.प्लॉ.नं.385B वडार वाडी शिवाजीनगर 14-08-2025
साई अमृत कन्स्ट्रक्शन एल.एल.पी. फा.प्लॉ.नं.486अ साईनाथनगर लक्ष्मीनारायण थियेटर जवळ पर्वती-1 13-08-2025
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. संजय गांधीनगर पिंपरी 24-07-2025
साई इन्फ्रा सि.स.नं.375 सचपीर वस्ती रास्तापेठ 27-06-2025
स्मार्टिक्स रिहॅब एल.एल.पी राजेवाडी नानापेठ 17-06-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. चैत्रबन वसाहत बिबवेवाडी 19-05-2025
पुर्णायू एंटरप्रायजेस फुले नगर MIDC भोसरी 30-04-2025
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन सि.स.नं.1967 हिराबाई लांडगे कासारवाडी 23-03-2025
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. प्लॉ.नं.56 ते 68 जाधव वस्ती रावेत 20-03-2025
वरद व‍िनायक डेव्हलपर्स दशभुजानगर एरंडवणा 20-03-2025
साई इन्फ्रा राजीव गांधीनगर येरवडा आळंदी रोड 20-03-2025
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. स.नं.23 24 कामना वसाहत कर्वेनगर हिंगणे बु 26-01-2025
चंद्रशेखर रिअल इस्टेट प्रा.लि. स.नं.58 कामना वसाहत कर्वेनगर हिंगणे बु 20-01-2025
तनुजय इन्फ्राकॉन एल.एल.पी. विद्यानगर आकुर्डी 03-01-2025
सुवर्णा गृहम् रुपीनगर निगडी 27-11-2024
पश्चिम बिल्डर्स जाधवनगर येरवडा 12-11-2024
बीम्स हाऊसिंग रियालिटी एल.एल.पी. राजीव गांधीनगर येरवडा 06-11-2024
साई प्रॉपर्टी सोल्यूशन एल.एल.पी. सर्वोदय कॉलोनी मुंढवा 15-10-2024
साई इन्फ्रा अण्णाभाऊ साठे वसाहत पर्वती 14-10-2024
न्यू सहारा कन्स्ट्रक्शन गुरुनानकनगर कासेवाडी भवानी पेठ 09-10-2024
प्रवीण त्र्यंबक भोसले प्रा.लि. विद्यानगर आकुर्डी 04-10-2024
आर. के. डेव्हलपर्स प्लॉ.नं.217 ते 258 जाधव वस्ती रावेत 09-08-2024
मगरपट्टा सिटी डेव्हलपमेंट कंपनी प्रा.लि. जहांगीरनगर हडपसर 17-05-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज काळभोरनगर आकुर्डी 09-05-2024
श्री सोनिगरा इंफ्राकॉन इंदिरानगर पिंपरी 26-04-2024
श्री सोनिगरा इंफ्राकॉन कैलासनगर पिंपरी 26-04-2024
सॅसकॉन डेव्हलपर्स आझादनगर निगडी सेक्टर नं.22 22-04-2024
शिवम डेव्हलपर्स प्रा.लि. पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत पौड फाटा 18-04-2024
ओम साई कन्स्ट्रक्शन गांधीनगर प‍िंपरी 15-04-2024
विघ्नहर्ता रियालीटी मोरेवस्ती भिमशक्तीनगर चिखली - 1 05-04-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज एम बी कम्प (विकासनगर) किवळे 12-03-2024
बी.एम.सी. प्रॉपर्टीज मुळानगर जुनी सांगवी 05-03-2024
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन संग्रामनगर निगडी सेक्टर नं.22 07-02-2024
अय्यम डेव्हलपर्स एल.एल.पी. जोशी वस्ती घोरपडेपेठ 05-02-2024
त्रिकाया बिल्डकॉर्प एल.एल.पी. साईनाथनगर थेरगाव 20-09-2023
युनिक सदानंद डेव्हलपर्स इंदिरानगर प्रोजेक्ट इंदिरानगर मंगळवारपेठ 18-09-2023
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. शास्त्रीनगर पिंपरी 12-09-2023
टी.आर.एस. इन्‍फ्रा भावसार कार्यालय घोरपडेपेठ 30-08-2023
श्री सोनिगरा इंफ्राकॉन अण्णाभाऊ साठेनगर निगडी सेक्टर नं.22 14-08-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. म्हस्के वस्ती रावेत 28-07-2023
रेनबो डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर एल.एल.पी. सुभाषनगर पिंपरी 18-07-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. काळभोरनगर आकुर्डी 12-07-2023
आर. के. डेव्हलपर्स रमाबाई निराधारनगर पिंपरी 14-06-2023
सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. श्रमिक वस्ती वडार वस्ती कर्वेनगर 14-06-2023
क्रिशाला इलाईट एल.एल.पी. अशोकनगर ताथवडे 22-05-2023
ग्रेस डेव्हलपर्स प्लॉ.नं.210 ते 216 जाधव वस्ती रावेत 19-05-2023
वाकडकर पाटील असोसिएट्स एल.एल.पी. प्लॉ.नं.191 ते 209 जाधव वस्ती रावेत 16-05-2023
सुशीलम प्रॉपर्टीज एल.एल.पी. सि.स.नं.276 277अ 278 ते 281अ 281ब बुधवारपेठ 23-12-2022
आर. के. डेव्हलपर्स नागसेननगर चिंचवड 05-12-2022
आर. के. डेव्हलपर्स अजंठानगर पत्रा शेड आकुर्डी 05-12-2022
रेनबो डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर एल.एल.पी. राजनगर ओटा स्कीम निगडी सेक्टर नं.22 06-10-2022
राजवीर असोसिएट्स गुरुदत्तनगर पिंपरी रेल्वे स्टेशन 21-07-2022
राजवीर असोसिएट्स भारतमातानगर पिंपरी रेल्वे स्टेशन 21-07-2022
रेणुका कन्स्ट्रक्शन स.नं.242 आनंदनगर चिंचवड 19-07-2022
राजवीर असोसिएट्स संजय गांधीनगर पिंपरी 10-05-2022
साई इन्फ्रा गजमलवाडी शिवाजीनगर 21-02-2022
स्पायर व्हेंचर्स सि.स.नं.830 भवानी मंदीर भवानीपेठ 24-01-2022
परमार बोरा असोसिएट्स पत्रा चाळ नानापेठ येथील SRD योजना 01-03-2021
कुणाल रियालिटी भोईरनगर चिंचवड 19-08-2020
श्री साईगुरु कन्स्ट्रक्शन तापकीरनगर रहाटणी 12-06-2020
विनर डेव्हलपर्स भीमनगर कोंढवा खुर्द 20-08-2019
साई इन्फ्रा स.नं.24 बोपोडी 24-12-2018
सुयश व्हेंचर्स स.नं.101/1 ब्लॉक 1ब जनवाडी जनता वसाहत 06-09-2018

झोपुप्रा योजना - डॅशबोर्ड

LIVE
झोपुप्राकडे सादर केलेल्या योजना
योजना संख्या 371
झोपडीधारक संख्या 126345
मंजूर केलेल्या योजना
योजना संख्या 295
झोपडीधारक संख्या 100131
दप्तरी दाखल केलेल्या योजना
योजना संख्या 44
झोपडीधारक संख्या 19804
प्रस्ताव दाखल करणेवर योजना
योजना संख्या 76
झोपडीधारक संख्या 26214
पूर्ण केलेल्या योजना
योजना संख्या 71
झोपडीधारक संख्या 12505
सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना
योजना संख्या 180
झोपडीधारक संख्या 67822

आमची गॅलरी

×
×
Zoomable preview
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority